पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : तेरे बिना जिंदगी से कोई
लेखक : हर्षद बर्वे
प्रकाशन : हर्षद बर्वे
मूल्य : ३००/-
कर्जत ते दिल्ली ह्या प्रवासात मी हर्षद बर्वेंचे तेरे बिना जिंदगी से कोई.. ह्या पुस्तकाचा फडशा पाडला. माझ्या मते ह्या पुस्तकाला कादंबरी म्हणता येणार नाही कारण मला मुळात हि सत्य घटना वाटत राहते. रवी, राधा आणि त्यांचा मुलगा राघव असे हे त्रिकोणी कुटूंब ! त्यात ते दोघे प्रचंड हुशार पण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे की, दोन हुशार एकत्र आले की, प्रत्यक्षात त्यांच्या नाहीतर दुसऱ्यांच्या आयुष्याची लावून जातात कारण त्यांना त्यांच्या हुषारीवर इगो यायला लागतो. असंच काहीसं ह्या घटनेत गुंफले आहे.
पुस्तक संपूर्णतः दोघांभोवती फिरत राहते. लग्न मूरत आलेले असताना बाटलीची काच टिचकावी तसं होतं आणि मग लग्न वाचण्यासाठी प्रचंड आटापिटा सुरू होतो. तू प्रियकर म्हणून अफाट आहेसच पण नवरा म्हणून प्रॉब्लेम आहेस, भन्नाट आहे राव ! लव्ह मॅरेज म्हटलं की, असं होणारचं असा पायंडा घेऊन समाजात वावरावे लागते पण arrange मॅरेज म्हणजे कुठे इतका मोठा तिर आहे शेवटी लग्न म्हणजे adjustment आहे हे उमजले पाहिजे आणि तेही वेळेतच ! आपण अशा देशात जन्माला आलो आहोत की, विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले म्हणून वादविवाद होतात तिथे काय अपेक्षा करायची, सॉलिड आणि परिस्थितीला धरून लेखकाने वाक्य गुंफली आहेत.
मी अधिक लिहणार नाही कारण वाचायला जी मजा येते ती सांगण्यात नाही. एकंदरीत हे पुस्तक मस्त आहे. प्रत्येकाने वाचावे असे आहे कारण लग्न प्रत्येकाचे (?) होणारचं आहे म्हणा. शेवटी लग्न टिकते की नाही ? हे मात्र तुम्ही ह्या पुस्तकात वाचा कारण end वेड लावतो.
No comments:
Post a Comment